Fact Check | लॉकडाऊननंतर १५ एप्रिलपासून रेल्वे धावणार?

Update: 2020-04-10 20:18 GMT

कोरोनामुळे सुरू असलेलं २१ दिवसाचं लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपत आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढवलं जाणार की शिथिल होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, शासकीय पातळीवर अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

असं असलं काही काही दिवसांपासून अनेक प्रसारमाध्यमांनी रेल्वेसंदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १५ एप्रिलपासून देशातील अनेक मार्गांवर रेल्वेसेवा पूर्ववत होणार असल्याबाबत अनेक वेबसाईट्सनी बातम्या दिल्या आहेत. यासोबतच सोशल मीडियावरही याबाबत पोस्ट व्हायरल आहेत.

संबंधित बातमीची लिंक

संबंधित बातमीची लिंक

संबंधित बातमीची लिंक

यांसह अनेक माध्यमांनी याबाबत बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

हे आहे सत्य :

लॉकडाऊन वाढवलं जावं की शिथिल करावं याबाबत केंद्र सरकार विचार करतंय. यासाठी राज्यांकडूनही अभिप्राय मागवण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत रेल्वेसेवा पूर्ववत होण्याचा प्रश्नच नाही.

माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्यानंतर भारतीय रेल्वेने यावर खुलासा केला आहे. लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा पूर्ववत होण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावरही रेल्वे मंत्रालयाने ताशेरे ओढलेत. अशा कठीण काळात प्रसारमाध्यमांनी माहितीची खातरजमा केल्याशिवाय बातम्या प्रकाशित करू नये अशी प्रतिक्रिया रेल्वे मंत्रालयाने दिलीय. काही माध्यम चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करत असून त्यावर प्रवाशांनी विश्वास ठेवू नये असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलंय.

https://twitter.com/RailMinIndia/status/1248153979860574209?s=19

https://twitter.com/RailMinIndia/status/1248561657338425344?s=19

निष्कर्ष :

१५ एप्रिलपासून रेल्वेसेवा सुरू होणार असल्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. रेल्वे मंत्रालयाने या बातम्यांचं खंडण केलंय.

 

Similar News