Fact Check | एपीजे अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने स्कॉलरशीप असलेल्या मेसेजचं सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप सुरू केल्याचे काही मेसेज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल आहेत.
दहावीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपये तर १२ वीत ८५ टक्क्यांपेक्ष जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपये स्कॉलरशीप आहे आणि त्यासाठीचे फॉर्म सरकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत असा तो मेसेज आहे. अधिकाधिक पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचं अवाहनही यात करण्यात आलंय.
ही पोस्ट समोर आल्यानंतर ‘मॅक्स महाराष्ट्र’ने त्याचा शोध घेतला. तेव्हा २०१५ पासून या आशयाचे मेसेज व्हायरल असल्याचं आढळलं.
यशवंत पागनीस यांनी २६ मे २०१५ रोजी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली होती.
६ एप्रिल २०१६ रोजीही हीच पोस्ट टाकण्यात आली आहे.
वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहीलेल्या राधे माँ यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरूनही २० ऑगस्ट २०१५ ला या स्कॉलरशीपबाबत पोस्ट करण्यात आली आहे.
भाजपच्या आसाम राज्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरही २६ मे २०१८ रोजी ही पोस्ट टाकण्यात आली आहे.
तथ्य पडताळणी –
व्हायरल मेसेजमध्ये मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. स्कॉलरशीपचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ही लिंक असल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आहे. आम्हीही फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला पण आता ही वेबसाईट बंद आहे.
http://desw.gov.in/ ही वेबसाईट केंद्र सरकारच्या माजी सैनिक कल्याण विभागाची आहे. ही वेबसाईट सुरू आहे. मात्र, त्याचा स्कॉलरशीपशी काहीही संबंध नाही. या वेबसाईटच्या URL मध्ये छेडखानी करून नवी लिंक व्हायरल मेसेजमध्ये वापरण्यात आली आहे.
‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडीया’ (PIB) यांनी या व्हायरल पोस्टबाबत खुलासा केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शिष्यवृत्ती योजना नाही असं पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
There is NO scholarship scheme in the name of former President APJ Abdul Kalam and former PM Atal Bihari Vajpayee that rewards the students of 10th or 12th class.
Hence, the claims made within the message is #Fake.#FakeNews pic.twitter.com/1kJtRRkhtt
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 14, 2020
निष्कर्ष –