FactCheck : झी न्यूज वर नामुष्की... संपादक सुधीर चौधरींचा शो ठरला फेक न्यूज

Update: 2019-07-05 08:03 GMT

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांचा शो फेक न्यूज म्हणून मार्क करण्यात आला आहे. फेसबुक ने गेल्या काही महिन्यांपासून फॅक्ट चेक सुविधा उपलब्ध केली आहे. मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवल्या जात असल्याने फेसबुक वर टीका होत होती. त्यामुळे फेसबुक ने देशातल्या काही मान्यवर संस्था आणि पत्रकारांच्या मदतीने सुरू केलेल्या फॅक्ट चेक म्हणजे सत्यता पडताळणाऱ्या यंत्रणेने सुधीर चौधरी यांनी तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या भाषणावर केलेल्या शो ला फेक न्यूज कॅटेगरी मध्ये टाकलं आहे.

झी न्यूज चे संपादक सुधीर चौधरी यांच्यावर या आधी 100 कोटी रूपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांशी सुसंगत भूमिका घेत विरोधी पक्षांवर हल्ला चढवण्याचं काम सुरू केलं होतं. चौधरी यांनी आतापर्यंत अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षांवर हल्ला चढवलेला आहे.

महुआ मोईत्रा यांनी फॅसिझमची लक्षणे सांगणारं भाषण लोकसभेत केलं होतं.

(सौ. मॅक्सवुमन)

Full View

हे भाषण प्रचंड गाजलं. प्रचंड व्हायरल झालेल्या या भाषणामुळे सत्ताधारी पक्षामध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर सुधीर चौधरी यांनी झी न्यूज वरील आपल्या डीएनए या शो मध्ये भाषणावर भाष्य करणारा शो केला होता.

Full View

मोईत्रा यांनी अमेरिकेतील एका नियतकालिकातील लेख चोरून लोकसभेत वाचला असा आरोप सुधीर चौधरी यांनी केला होता.

अमेरिकेतील मार्टीन लाँगमॅन यांचा हा लेख असून मोईत्रा यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात मार्टीन लाँगमॅन यांना आवश्यक ते सौजन्य दिले होते. त्यामुळे हे भाषण म्हणजे मुद्दे चोरून केलेले होते हा चौधरी यांचा आरोप खोटा ठरला आहे. <

/h3>

मोईत्रा यांचं भाषण म्हणजे प्लॅगॅरिजम असल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या काही पत्रकारांनी लावला होता. हा आरोप खोटा ठरला आहे. आधी सुधीर चौधरी यांचा शो फेक न्यूज असल्याचं सिद्ध झालं आहे.

Similar News