Home > News Update > नांदेडात घडला गंभीर प्रकार; रागाच्या भरात व्यक्तीने फोडली EVM मशीन

नांदेडात घडला गंभीर प्रकार; रागाच्या भरात व्यक्तीने फोडली EVM मशीन

नांदेडात घडला गंभीर प्रकार; रागाच्या भरात व्यक्तीने फोडली EVM मशीन
X

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात आज अमरावती, बुलढाणा, अकोला, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पाडली. अशातच नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने बेधडक तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे तो आरडा-ओरडा करत सांगत होता. मतदान केंद्रावर गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाने दावा केलाय.

या घटना प्रकारामुळे रामतीर्थ मतदान केंद्रावर गदारोळ उडाला होता. सदरील व्यक्तीने ईव्हिएम मशीन आणि व्हीव्ही पॅट मशीन कुऱ्हाडीने तोडल्याने सर्वसामान्य मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रसंगावधान पाळत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मुख्य कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याचे वेळीच जाहीर केले आणि होणारा अनर्थ टाळला. यामुळे यापूर्वी झालेले ५०० मतदान गोपनीय व सुरक्षित असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे.

Updated : 26 April 2024 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top