Home > Max Political > राज्यातील लोकसभेच्या प्रथम टप्प्यातील ५ मतदारसंघात मतदानाला सुरुवात

राज्यातील लोकसभेच्या प्रथम टप्प्यातील ५ मतदारसंघात मतदानाला सुरुवात

राज्यातील लोकसभेच्या प्रथम टप्प्यातील ५ मतदारसंघात मतदानाला सुरुवात
X

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान सुरू आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या एकुण पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा आज पहिला टप्पा असून सध्या विदर्भात मतदान होत आहे.

विदर्भातील या ५ मतदारसंघात एकुण ९७ उमेदवार मैदानात उतरले असून ९५,५४,६६७ एवढे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नक्षलप्रवण भाग असलेल्या गडचिरोलीतील दुर्गम भागात सात हेलिकॉप्टरने ईव्हीएम व निवडणूक कर्मचारी पाठवले आहेत.

मतदान करण्याची सर्वसाधारण वेळ ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. गडचिरोतील आरमोरी, आमगांव, गडचिरोली, अहेरी व भंडारातील अर्जूनी मोरगांव विधानसभा मतदारसंघात ३ पर्यंत मतदानाची वेळ असेल. नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये भाजप व काँग्रेसचा थेट सामना तर रामटेकमधून भाजप व काँग्रेसची टक्कर होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे नागपूर तर कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे राज्यातील जनतेचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागलेले आहे.

नागपूरात मतदानासाठी नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा :

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात हजारी पहाड (मतदान केंद्र क्र. २०४) आणि दाभा (मतदान केंद्र क्र. २०५) येथे मतदानाला हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.




चंद्रशेखर बावनकुळेंनी मतदानाचा हक्क बजावला :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडीच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपला अनमोल असलेला मतदानाच हक्क बजावला आहे.

यावेळी, बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. मतदानाचं प्रमाण हे जास्तीत जास्त झाले पाहिजे असं म्हणत पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागावर आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.




सुनील मेंढेंनी सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावला :

महायुतीचे भंडारा-गोंदियाचे उमेदवार असलेल्या सुनील मेंढे यांनी भंडाऱ्यातील नुतन महाविद्यातील मतदान बुथवर जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी सुनील मेंढे हे आपल्या समस्त कुटूंबासह मतदानासाठी जाऊन त्यांनी मतदान केले.





Updated : 19 April 2024 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top